अकोला (प्रतिनिधी): एका व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करून दुसऱ्याच्या नावाने महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणाऱ्याला खदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पवन एकनाथ कवहळे (वय २४, रा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोनू रामधन इंगळे (वय २५) हे पत्नी बीएसएफमध्ये नोकरीला असल्याने राजस्थानमध्ये येथे राहतात. सोनूच्या फेसबुक अकाउंटवरून मुंबईच्या एका महिलेसोबत अश्लील चॅटिंग सतत केल्या जात असल्याने महिलेने त्या अकाउंटवरील मोबाइल नंबर मिळवला आणि सोनू इंगळे यांना फोन करून धमकावले.
मात्र आपण चॅटिंग केली नसून आपल्या अकाउंटवरून दुसरेच कुणीतरी चॅटिंग करीत असल्याचे त्यांनी महिलेला सांगितले व स्वत: खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ व ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी त्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात कव्हले तेथून जो कुणी फेसबुक अकाऊट वापरले त्यांचा शोध घेतला असता ते जालना येथील पवन कवहळे याने वापरल्याचे समोर आले. त्यानंतर खदान पोलिसांची एक पथक जालना येथे गेले. त्यांनी आरोपी पवनला अटक केली. ही कारवाई ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात गोपीलाल मावळे, अविनाश पाचपोर, राजेंद्र तेलगोटे व सायबर पोलिस ठाण्याचे प्रशांत केदासे यांनी केला.
अधिक वाचा : पत्नीने पतीवर केला कुऱ्हाडीने हल्ला; गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola