• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मतदार जागृतीसाठी कार्यालयांनी मतदार जागृती मंचाची स्थापना करावी : जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोला
12
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : मतदार जागृतीसाठी निवडणुक आयोगाने विविध शासकीय विभाग तसेच स्वयंसेवी संस्था, महामंडळ तसेच अन्य संस्थांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्याची सूचना केली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यालयाने आपल्या कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन करावा आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात मतदार जागृती मंच समितीचा बोर्ड लावावा, अशी सूचना प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केली.

नियोजन भवनात आज मतदार जागृती मंच कार्यक्रमाचे उदघाटन श्री. लोणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, नायब तहसिलदार सतीश काळे उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमखांची उपस्थिती होती.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे, त्यासाठी शासकीय कार्यालये व इतर संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असे निवडणुक आयोगाचे मत आहे. त्यानुसार आयोगाने कार्यालयांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्याचे सूचित केले आहे. या मंचचा उददेश मतदार नोंदणी, निवडणुक प्रक्रीया तसेच मतदारांमध्ये मताच्या हक्काची जाणीव करुन देण्याचा राहील. मतदार जागृती मंचाच्या कार्यक्रमांचे योग्य आयोजन केले तर शासकीय कार्यालयातील सदस्यांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण होईल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यामध्ये मोलाचे सहकार्य होईल. प्रत्येक कार्यालयाने आपल्या कार्यालयात तातडीने मतदार जागृती मंचाची स्थापना करावी. तसेच निवडणुकीचे काम हे अत्यंत महत्त्वपूर्ण असून या कामामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई करु नये, असे यावेळी श्री. लोणकर यांनी सांगितले.

श्री. खवले यांनी मतदार जागृती मंचचा उददेश सविस्तरपणे स्पष्ट केला. मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे, इव्हीएम/व्हीव्हीपॅट म्हणजे काय, तसेच वेळोवेळी निवडणुक आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांची माहिती या मंचच्या माध्यमातून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अवगत करण्याबरोबरच मतदारांमध्ये मतदान प्रक्रीयेची माहिती देण्याची सूचना त्यांनी केली. प्रास्ताविक श्री. काळे यांनी तर सूत्रसंचालन सचिन भांबेरे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या बोर्डाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फीत कापून विमोचन करण्यात आले.

अधिक वाचा : दानापूर हनुमान प्रसाद जनता विद्यालय येथे निसर्गाची धमाल शाळा कार्यशाळा संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

दानापूर हनुमान प्रसाद जनता विद्यालय येथे निसर्गाची धमाल शाळा कार्यशाळा संपन्न

Next Post

फेसबुक अकाउंट हॅक करून महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला अटक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अकोला शेगाव

फेसबुक अकाउंट हॅक करून महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला अटक

murder crime

वृद्ध पित्याची हत्या : मुलगा, सुनेची रवानगी कारागृहात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.