दानापूर (सुनीलकुमार धुरडे) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 मार्फत आयोजित स्कूल प्रोजेक्ट पाणी फौंडेशन -निसर्गाची धमाल शाळा ही कार्यशाळा स्थानिक हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय दानापूर येथे यशस्वीरित्या संपन्न झाली.
दि:-11 जानेवारी 15 जानेवारी पर्यंत या कार्यशाळेचे आयोजन विद्यालयामध्ये करण्यात आले. यामध्ये वर्ग 7 ते 9 पर्यंतच्या एकूण 30 मुला-मुलींना सहभागी करण्यात आले. या चार दिवसच्या कार्यशाळेमध्ये मुलांना निसर्ग,माती,पाणी आणि मानवी जीवन यावर आधारित बाबी कृतीच्या माध्यमातून आणि चित्रफितीच्या माध्यमातून खूप सुंदर अशा पद्धतीने सांगण्यात आल्या.
या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून श्री.तुळशीराम लोटी, कु,राधिका मालपुरे आणि तालुका समन्वयक श्री. अनिकेत लिखार श्री.अंबादास खडसान यांचे मार्गदशन लाभले. शाळेचे व्यवस्थापक डाॅ .अजेय विखे यांनी उपक्रमाला भेट देऊन पाणी फाऊंडेशनच्या सामाजिक टीमचे कौतुक केले व शुभेच्छा हि दिल्या शालेय नियोजन श्री.माकोडे सर यांनी मा.मुख्याध्यापक श्री . श्रीराम डाबरे, परिवेक्षक विलास गावंडे, यांच्या नेतृत्वात केले. यावेळी शिक्षकांचे सुध्दा मोलाचे योगदान लाभले .
अधिक वाचा : युवसेने कडून जिजाऊ जयंती सोहळा साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola