अकोला (प्रतिनिधी) : जिल्हयात 3 फेब्रुवारी 2019 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस पाजणे आवश्यक असून पालकांनी आपल्या मुलांना दक्षतेने ही लस पाजून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दि. 3 फेब्रुवारी रोजी जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आदींसह बसस्टँड, रेल्वेस्थानक या ठिकाणी पोलिओ लसीची सुविधा उपलब्ध राहिल. याशिवाय आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊनही लसीकरण केले जाणार आहे. पालकांनी सदर दिवशी दक्षतेने आपल्या मुलांना पोलिओ लस देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेपासून एकही बालक वंचित ठेवू नये : जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola