अकोला (पप्रतिनिधी) : गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा दि. 27 नोव्हेंबर 2018 पासून अकोला जिल्हयात प्रारंभ झाला. आतापर्यंत 3 लाख पेक्षा जास्त बालकांना ही लस देण्यात आली आहे.
साधारण 74 टक्के बालकांना लस देण्यात आली आहे. निरोगी आरोग्यासाठी ही लस अत्यंत महत्त्वाची असून ज्या बालकांना अदयाप ही लस देण्यात आली नाही, त्यांच्या पालकांनी मनात कुठलीही शंका न बाळगता आपल्या पाल्याला ही लस दयावी. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन पालकांचे समुपदेशन करावे. या लसीपासून एकही बालक वंचित ठेवू नये, अशी सूचना प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले.
लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा शल्य चिकित्सत डॉ. आरती कुलवाल, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. एस.आर. ठोसर आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, मनपाचे वैदकीय अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गोवर-रुबेला लस ही 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना दिली जात आहे. ही लस अतिशय सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. जरी बालकाला ही लस यापूर्वीच टोचण्यात आली असली तरी त्याला ही लस जरुर टोचून घ्याव. शाळा, अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रांवर ही लस देण्यात येत आहे.
आतापर्यंत जिल्हयातील 3 लाख 16 हजार 618 बालकांना लस देण्यात आली आहे. ज्या भागात लसीकरणासाठी विरोध होत आहे. तेथे आरोग्य विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक यांनी पालकांचे समुपदेशन करावे. लसीबाबतचे गैरसमज दूर करुन लसीचे महत्त्व पटवून दयावे, असे श्री. लोणकर यांनी सांगितले.
याच बैठकीत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेतंर्गत पोषक आहारासाठी गरोदर व स्तनदा मातांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी त्यांच्या खात्यात थेट रुपये 5 हजार जमा करण्यात येतात. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याची सूचना श्री. लोणकर यांनी केली. या योजनेसाठी लाभार्थीकडे आधार कार्ड व त्याचे स्वत:चे बँक खाते असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थीकडे आधारकार्ड नाही, त्यांच्यासाठी शिबीर घेऊन त्यांना प्राधान्याने आधारकार्ड दयावे, तसेच बँक खात्यासाठीही सहकार्य करण्याची सूचना त्यांनी केली.
अधिक वाचा : युवसेने कडून जिजाऊ जयंती सोहळा साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola