अकोला (प्रतिनिधी) : आज सोमवार दि.14/01/19. रोजी बार्शीटाकळी पो.स्टे. हद्दीतील “ग्राम चांगेफड” येथे SGSPS फार्मसी महाविद्यालय, कौलखेड, अकोला येथील NSS कॅम्प मधील विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी SWAS टीमची सर्वसमावेशक कायदेविषयक कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेमध्ये SWAS टीम सदस्या कु. स्नेहल राठोड ह्यांनी “सायबर सुरक्षा” ह्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु.जुई चिमनकर ह्यांनी “स्त्री सक्षमीकरण”ह्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पो.कॉ.गोपाल मुकुंदे ह्यांनी “जन्मापासून ते सरनापर्यंत” असलेल्या कायदेविषयक बाबींवर प्रकाश टाकला.
कार्यशाळेला महाविद्यालयाचे विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी प्रा.खटाळे सर, गावातील आबालवृद्ध व पो.कॉ. विशाल मोरे ह्यांची प्रमुख उपस्थिती होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola