भारत आणि इंग्लंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध वाढवणाऱ्या सेक दीन मोहम्मद यांच्यावर गुगलने विशेष डुडल बनवले आहे. १७५९ साली पाटणा येथे जन्मलेले मोहम्मद इंग्लंडमध्ये रेस्टॉरंट उघडणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. १७९४ साली त्यांनी आजच्याच दिवशी इंग्लंडमध्ये पहिले इंग्रजी पुस्तक प्रकाशीत केले होते.
वयाच्या १० व्या वर्षी वडलांचे छत्र हरपले. त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीत कार्यरत होते. वडलांच्या निधनानंतर त्यांना कॅप्टन गॉडफ्रे इवान बेकरच्या विंगमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर ते १७८२ मध्ये ब्रिटनमध्ये आले. ८ वर्ष या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांनी भारतीय रेस्टॉरंट उघडले. हे रेस्टॉरंट हिंदुस्तान कॉफी हाउस या नावाने ओळखले जायचे. ते फारशे चालले नाही. दोन वर्षानंतर बंद पडले. त्यानंतर ते ब्राइटन शहरात आले. या ठिकाणी त्यांनी एक बाथ स्पा उघडला. मोहम्मद ग्राहकांना हर्बल स्टीम बाथ द्यायचे. तसेच ग्राहकांची चंपी (डोक्याची मालिश) करायचे.
मोहम्मद यांची चंपी ब्रिटन आणि युरोपमध्ये खूप प्रसिद्ध झाली. त्यांच्या चंपीची भूरळ तिथल्या राजालाही पडली. मोहम्मद यांच्याकडून चंपी करून घेण्यासाठी १८२२ मध्ये चौथे किंग जॉर्ज यांनी त्यांना खासगी चंपी सर्जन म्हणून नियुक्त करून घेतले. त्यानंतर ते आणखी प्रसिद्ध झाले.
इंग्लंडच्या ब्राइटन संग्राहलायत सेक मोहम्मद यांचा मोठा फोटो आहे. दोन्ही देशांची संस्कृती जोडण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे लोक आजही मानतात. सेक मोहम्मद यांचे १८५१ मध्ये ग्रँड परेड, ब्राइटनमध्ये निधन झाले.
अधिक वाचा : स्वातंत्र्य दिवसानिमित्त Google ने Doodle करून नागरिकांना दिल्या शुभेच्छा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola