अकोला (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीला इतिहास असून ते आदिवासी असल्याचे अनेक ब्रिटिश कालीन पुरावे आहेत. विविध जातींना मिळणाऱ्या आरक्षणाप्रमाणे महादेव कोळी आदिवासी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार. तसेच लवकरच कोळी महादेव जमातीच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक करणार, असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज दिले.
वऱ्हाड प्रांतातील आदिवासी महादेव कोळी जमातीतील विविध संघटनांनी आयोजित केलेल्या अकोट येथील रेल येथे महाअधिवेशनमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ज. पा. खोडके, समदा काशीपुरचे मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री दशरथ भांडे, आदिवासी विकास संघाचे अध्यक्ष मोतीलाल सोनवणे, गणेश सोनवणे, अकोटचे माजी सभापती शंकरराव बुंदे पाटील, रघुनाथ इंगळे, डॉ. महेंद्र काळे, शामराव आपोतीकर, मनोहर बुध, एकनाथ जुवार, बाबा जुवार, बाळासाहेब अपोतीकर, माजी प्राचार्य शांताराम बुटे, संस्थानचे अध्यक्ष रामभाऊ घुगरे, वासुदेव खेडकर, पी. टी. पाटील, संजय तराळे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या समस्या गंभीर आहेत. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या सरकार दरबारी मांडून यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात प्रमाणपत्र व वैधता न मिळाल्यामुळे धोक्यात आले आहेत, त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन डॉ. पाटील यांनी यावेळी दिले. या महाअधिवेशनाला पुरुषांसह महिलांची जास्त उपस्थिती लक्षणीय असल्याने उपस्थित महिलांचे कौतुक त्यांनी केले.
कोळी समाजाला घटनादत्त आरक्षण मिळालेले असून अनुसूचित जमातीमध्ये मोडणाऱ्या या जमातीला शासनाचे शासनाने संरक्षण दिले आहे. मात्र, राज्य शासनाने गठित केलेल्या जात पडताळणी समित्या त्यात खोडा घालत आहेत. त्यामुळे त्या अगोदर बरखास्त कराव्यात संघटना बरखास्त करावी. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून याबाबत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री दशरथ भांडे यांनी केली. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सुधाकर घुगरे, रघुनाथ खडसे, पंढरीनाथ डांगरे, बाळू जुवार, प्रकाश पाटील, अनिल फुकट, यादवराव ठाकरे, गोपाळराव ढोणे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : तेल्हारा तालुक्यातील मौजे उमरी येथे मा. अनिलभाऊ गावंडे यांची ग्राम बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola