मी टू प्रकरणी आता दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव पुढे आले आहे. एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. हफिंग्टन पोस्ट या संकेतस्थळाने केलेल्या दाव्यानुसार, ‘संजू‘ सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शनाचे काम केलेल्या महिलेने हिरानी यांच्यावर आरोप केले आहेत. या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या वेळी हिरानी यांनी आपले शोषण केले असा या महिलेचा आरोप आहे.
हिरानी यांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ‘मी हे सर्व आरोप फेटाळून लावतो. कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी मी तयार आहे.’ या महिलेने संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘वडील दुर्धर रोगाने ग्रस्त असल्याने या नोकरीची मला गरज होती. त्यामुळे हिरानी यांचे गैरवर्तन मी सहन केले आणि आपले काम करत राहिले.’
आपल्यावरील अत्याचाराबाबतची माहिती या सिनेमाचे सहनिर्माते विधु विनोद चोप्रा यांना ईमेलद्वारे दिली होती, असा दावा या महिलेने केला आहे.
अधिक वाचा : ‘मणिकर्णिका’चं पहिलं गाणं प्रदर्शित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola