• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

शेतात या, थांबा, खा-प्या अन् कामही शिका; केळी निर्यातक शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना थेट शेतीकामाचे धडे देण्यासाठी बोथरा (पणज) येथील प्रयोगशील शेतकरी पुरुषोत्तम बोचे यांनी अफलातून प्रयोग करण्याचे ठरविले आहे. शेतात या, दिवसभर थांबा, खाणं-पिणं करा अन् शेतीकामही शिका, असा हा नवा प्रयोग आहे. या प्रयोगातून शेतीपर्यटन तर होईलच, विद्यार्थ्यांना शेतीची विशेषतः बागेतील कामकाजाची रितही माहित होणार आहे.

या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने बोचे यांना मदतीचा हात दिला असून ‘शेतकरी ते ग्राहक‘ही नवी संकल्पना रुजवण्यासाठी याहून उत्तम प्रयोग असूच शकत नाही, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रयोगाच्या प्रात्याक्षिकासाठी शहरातील दोन नामांकित शाळांशी संपर्क साधण्यात आला असून त्यापैकी एका शाळेच्या विद्यार्थ्यांची कृषी सहलही लवकरच आयोजित केली जाणार आहे. फळपिकांसाठी पोषक असलेली पुरेशी जमीन पुरुषोत्तम बोचे यांच्याकडे आहे. अकोट तालुक्यातील बोथरा-पणज शिवारातील या शेतीत ते केळीचे पीक घेतात. ही केळी उत्कृष्ट दर्जाची असल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी आहे. त्यामुळे केळी निर्यातक म्हणूनही बोचे यांची नवी ओळख रुढ झाली आहे. ही केळी दुबई, इराण, अफगाणिस्तान अशा ठिकाणी पाठवली जाते. तो क्रम अजूनही सुरु आहे. या वर्षीच्या मोसमात ३५ कंटेनर रवाना झाले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एका कंटेनरमध्ये सुमारे २० टन केळी असते. त्यानुसार आतापर्यंत ७०० टन केळीची निर्यात केली गेली. विशेष असे की यामुळे त्यांना रग्गड कमाई झाली असून ही केळी देशांतर्गत विकली असती तर चारपट कमी रक्कम मिळाली असती, असे त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात शेतीसंदर्भात नवे प्रयोग केले जात आहेत. त्यासाठी आरडीसी राजेश खवले, रोहयोचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर व इतर अधिकारी परिश्रम घेत आहेत. दर बुधवारी शेतकऱ्यांसाठीची कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे गटशेती व सामूहिक शेतीला प्रोत्साहन मिळत आहे.

रसायनाने नव्हे, नैसर्गिक पद्धतीने :

केळी पिकविण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. परंतु बोचे यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवली जाते. त्यामुळे तिचा स्वाद आणि गुणवत्ता दोन्ही गोष्टी टिकून राहतात. शिवाय मानवी आरोग्यास पोषक असे तत्वही त्यातून प्राप्त होते. निर्यातीसाठी हीच वैशिष्ट्ये कारणीभूत ठरली आहे.

खारपाणपट्ट्याचा बाऊ कशाला ? :

बोचे यांचा शेतीउद्योग पाहू जाता खारपाणपट्ट्याचा उगाच बाऊ कशाला, अशा प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधूनच उमटू लागल्या आहेत. विशेष असे की बोचे यांच्यासोबत आणखीही काही शेतकरी जुळले असून त्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे निर्यात अव्याहतपणे सुरु ठेवणे जिल्हा प्रशासनाला शक्य झाले आहे.

अधिक वाचा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजमाता जिजाबाई जयंती निमित्य खामगांव येथे रुग्णांना कपडे वाटपाचा कार्यक्र्म संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Previous Post

तेल्हारा तालुक्यातील मौजे उमरी येथे मा. अनिलभाऊ गावंडे यांची ग्राम बैठक संपन्न

Next Post

पत्नीने पतीवर केला कुऱ्हाडीने हल्ला; गुन्हा दाखल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

पत्नीने पतीवर केला कुऱ्हाडीने हल्ला; गुन्हा दाखल

राजकुमार हिरानी

#MeToo : राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.