बाळापूर (प्रतिनिधी): भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बाळापूर ते पारस फाट्यादरम्यान ११ जानेवारी रोजी दुपारी घडली. अरविंद समाधान सिरसाट व मो.सोहेल अनिस अहमद असे गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
अरविंद सिरसाट रा.बाळापूर हा दुचाकी क्र.एमएच ३० आर ५३४३ ने पारस फाट्याकडे जात होता. दरम्यान, समोरुन येत असलेली दुचाकी क्र. एमएच ३० एसी ००१७ व सिरसाट यांच्या दुचाकीदरम्यान जबर धडक झाली. या अपघातात अरविंद सिरसाट व मो.सोहेल अनिस अहमद हे गंभीर जखमी झाले तर मो.आकीब अब्दुल अकीब हा जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती, की दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला.
घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तातडीने बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : इंडिका कार मधून गायींची निर्दयपणे वाहतूक-गुन्हा दाखल!अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola