अकोट (प्रतिनिधी) : कत्तलीच्या उद्देशाने दोन गायी चक्क इंडिका गाडीत कोंबून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती, एका सुज्ञ नागरिकाने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली त्या माहितीच्या आधारे, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पिंपरी जैनपूर येथे पोहोचले.
पोलिस दिसताच दोन चोरटयांनी गाडी व गायी सोडून घटनास्थळावरून पळ काढण्याची, घटना ११जानेवारीच्या पहाटे २ ते ३वाजताच्या दरम्यान घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रात्रीची गस्तीवर असताना, अकोट ते हिवरखेड दरम्यान, रोडवर एम.एच- 01 – 4128 क्रमांकाच्या इंडिका चार चाकी गाडीचे चाक पंक्चर झाल्याने उभी होती.याठिकाणी पोलीस पोहोचता बरोबर, तेथून वाहन चालक आणि त्याचा सहकारी पोलिसांना पाहून पळून गेले.
गाडीची तपासणी केली असता, त्यागाडीमध्ये दोन गायी कोंबून आणल्या होत्या. दरम्यान गाडी पंक्चर झाल्याने चोरटयांनी पिंप्रि जैनपुर येथे गाडीचे चाक बदलण्याचा प्रयत्न सुरु होता.तेथील एका सुज्ञ नागरिकाला गाडीत कोंबलेल्या गायी दिसल्याने त्याने ग्रामीण पोलिसांना कळविले. ग्रामीण पोलिस स्टेशनचे कम॔चारी घटनास्थळी पोहचत असतानाच दुरून चोरटयांना पोलिस रूपनर यांच्या फिर्यादी वरून अज्ञान गाडी चालक व त्याच्या साथीदार विरूध्द कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 5,9 अ,मुंबई पोलिस कायदा 1960 चे कलम 119 ,कलम 5 (ब)9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 सहकलम महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 119,सहकलम प्राणी निद॔यीपणे वागविने अधिनियम 1960, कलम 11 (ड) (ज) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक वाचा : राहुल खारोडे आत्महत्या प्रकरणातील एकाचा अटकपूर्व जामीन नाकारला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola