तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा येथील नगर परिषद चे माजी नगर सेवक राहुल खारोडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली तेल्हारा पोलिसांनी मृतक राहुल खारोडे याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात तेल्हारा येथील संदीप शिवाजी मोरे, वर्षा पवार, पूजा पवार , माया मोरे यांच्याविरुद्ध भाद्विच्या कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपी हे फरार होते. दरम्यान यातील आरोपीने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अकोटच्या स्टेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता.
यामध्ये विद्यमान सेशन कोर्टाचे न्यायाधीश श्रीखंडे यांनी या प्रकरणातील आरोपी संदीप शिवाजी मोरे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला असून महिला आरोपी वर्षा पवार, पूजा पवार , माया मोरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करीत यांनी पोलीस स्टेशन तेल्हारा येथे सोमवारी व गुरवारी रोजी आरोप पत्र दाखल करेपर्यंत हजेरी लावून तपासात सहकार्य करावे. साक्षीदारावर दबाव टाकू नये, असा आदेश ८ जानेवारी रोजी पारित केला आहे.
न्यायालयाने संदीप शिवाजी मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने पोलिसांना आरोपीस अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक वाचा : अवैध दारू विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola