अकोला (प्रतिनिधी) : शहरातील भारत नगरमध्ये ऑटो उलटून झालेल्या अपघातात दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या अकोट फैल प्रभागाअंतर्गत हा परिसर येतो. खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला होता.
रस्त्यात असलेल्या खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत अकोट फैल प्रभागातील संतप्त नागरिकांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढला होता. या घटनेनंतर महानगरपालिका उपायुक्त व विरोधी पक्षनेत्यांनी अकोट फैल प्रभागातील रस्ते आणि नाल्यांची आज पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी पोलिसांचाही बंदोबस्त होता.
अकोट फैल प्रभागातील भारत नगरमध्ये रस्त्याच्या खड्ड्यामध्ये मागील चाक अडकून ऑटो रिक्षा उलटला होता. अपघातादरम्यान मोहम्मद तौसिफ या दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. अकोट फैलमधील अनेक रस्ते हे खराब असून, या रस्त्यात लहान मोठे खड्डे असून त्यामध्ये नाल्यातील पाणी साचले आहे. परिणामी चालकांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा वाहनासह चालक खाली पडल्याची घटना येथे नेहमीच घडते. खराब रस्त्यांमुळे येथील अपघाताचे प्रमाण वाढल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला. नागरिकांच्या रोषानंतर मनपा उपायुक्त पूजा करावी आणि विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्यासह नगरसेवकांनी भारत नगर भागातील रस्ते व नाल्यांची पाहणी केली.
अधिक वाचा : अंगावर ऑटो पलटी झाल्याने चिमुकला ठार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola