अकोला (प्रतिनिधी) : रिलायंस जिओचे केबल टाकण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक कुठलीही परवानगी संबंधितांनी महानगरपालिकेकडून घेतली नसल्याचे आढळल्याने मनपाच्या विद्युत विभाग व अतिक्रमण विभागाद्वारे संयुक्तरीत्या कारवाई करून केबल जप्त करण्यात आली.
अकोला शहरातील नागरिकांनी त्यांच्या घरावर किंवा अपार्टमेंटवर कोणत्याही प्रकारच्या केबल नेटवर्कची केबल टाकली असल्यास संबंधित मालमत्ता धारकांनी मनपाच्या परवानगीबाबत खात्री करावी. केबल धारकाकडे मनपाची रीतसर परवानगी नसल्यास नागरिकांनी त्याची तक्रार महागनरपालिकेच्या विद्युत विभागात करावी, असे आवाहन महापौर विजय अग्रवाल व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी यावेळी केले.
केबल जप्त करण्याची कारवाई मनपा विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादुर, संजय थोरात, विजय बडोणे व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.
अधिक वाचा : अकोला मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola