मुंबई : वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि मराठी भाषा टिकावी यासाठी आगळय़ावेगळय़ा पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन बंडय़ा मारुती सेवा मंडळ आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे अवघ्या 70 रुपयांत 100 ते 600 रुपयांपर्यंतची दर्जेदार वाचनीय पुस्तके पुस्तकप्रेमींना उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक 16 च्या मैदानात 21 जानेवारीपर्यंत सुरू राहील.
नुकतेच या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष संजय चौकेकर, बंडय़ा मारुती सेवा मंडळाचे सरचिटणीस राहुल जाधव, ज्येष्ठ गिरणी कामगार विठोबा भोसले, डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर, शाखाप्रमुख दीपक बागवे, गोपाळ खाडे, बंडय़ा मारुती सेवा मंडळाचे कार्यकर्तेदेखील यावेळी उपस्थित होते. हा स्तुत्य उपक्रम परिसरातील लोकांसाठी राबविल्याबद्दल आमदार शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे कौतुक केले.
अधिक वाचा : मानवी जीवनात देवालयाइतकेच वाचनालयाचे महत्व असावे -पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील