अकोला(प्रतिनिधी) – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 305 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस , प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सामुहिक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन संबंधीत विभागाच्या अधिका-यांना तक्रारीवर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले.
मुर्तिजापुर येथील राजगुरू नगर येथील रहिवासी यांनी दलीत वस्ती मध्ये रस्ता ,पाणी, व सांडपाणी वाहुन जाण्यासाठी नाल्या आदि सुविधा नसल्याची तक्रार दिली. त्यावर दलीत वस्तीसाठी संबंधीत नगर पालीकेला निधी वितरीत करण्यात आला असुन त्यातुन राजगुरू नगरामधील कामे प्राधान्याने करण्यात यावी अशा सुचना त्यांनी संबंधीत अधिका-यांना दिल्यात.
बार्शिटाकळी तालुक्यातील ढाकली येथील शेतक-यांनी धरणाच्या बँक वॉटरचे पाणी शेतातुन जाऊन शेत खराब झाले असल्याची तक्रर केली. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे महानगरपालीकेचे हद्दवाढ झाल्यानंतर समाविष्ठ ग्रामपंचायतीचे कर्मचा-यांचे महानगरपालीकेत समायोजन करण्याबाबत निवेदन देण्यात आले. पातुर तालुक्यातील चान्नी येथील शेतक-यांना त्रास देणा-या श्री. लाड या तलाठी यांची बदली बाबत कार्यवाही करण्याचे निवेदन गावक-यांनी दिलेत. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीतपाटील यांनी तक्रारींची दखल घेऊन संबंधीत विभागांना तक्रारीचे निरासरन करण्याबाबत निर्देश दिलेत.
प्रारंभी पालकमंत्री यांनी सार्वजनिक प्रश्नांच्या तक्रारी स्विकारल्या. यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले. पालकमंत्री यांनी विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारकर्त्यांचे म्हणने ऐकून घेत अधिकाऱ्यांना तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 222 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता.
तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली. पाणी फाउंडडेशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेचे बक्षिस वितरण या कार्यक्रमात पाणी फाउंडडेशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा 3 मध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील पहिल्या तीन क्रमाकांच्या गा्रमपंचायतीना मा. मुख्यमंत्री सहायता निधीतंर्गत प्रथम क्रमांकाच्या ग्रा.प्र. किनखेड व्दितीय क्रमांक खेर्डा खु. व तृतीय क्रमांक लोहगड तांडा यांना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते अनुक्रमे 5 लाख , 5लाख, व 3 लाख रुपयाचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
किनखेडचे सरपंच संजय आंधळे , खेर्डाच्या सरपंच भाग्यश्री संदीप चौधरी व लोहगड तांडाच्या सरपंच संध्याताई अविनाश पवार यांनी सदर धनादेश स्विकारला. यावेळी पाणी फाउंडडेशनचे जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड , तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ यांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली रिधोरा गावाची पाहणी ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या अडचणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola