अकोला :- जनसामान्यांच्या आरोग्यासाठी, दि. 9 व 10 फेब्रुवारी 2019 रोजी अकोला शहरातील शासकीय वैदयकीय महाविदयालयात भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांसाठी विनामुल्य असणाऱ्या या शिबीरात तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांच्या तपासणीसह चाचण्या, औषध-उपचार आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार ॲड. संजय धोत्रे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक मा. खासदार यांच्या मतदारसंघात सन 2018-19 या वर्षामध्ये आरोग्य मेळावा घेण्याबाबत सूचना केली आहे. त्या अनुषंगाने अकोला शहरात पुढील महिन्यात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारी संबंधी बैठक आज लोकशाही सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल आणि आरोग्य विभागाशी संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य मेळाव्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य मेळाव्यात सामान्य आजारांसोबतच हदय रोग, कॅन्सर, मेंदू, किडणी, डोळयाशी संबंधित गंभीर आजारांच्या रुग्णांची विशेष तपासणी केली जाणार आहे. या आजारांचे निदान झाल्यास रुग्णांवर पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मेळाव्यात सरकारीसह विविध खाजगी रुग्णालयांच्या तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे विदयार्थी, नर्सिंग कॉलेजचे विदयार्थी व विदयार्थीनी यांचासुध्दा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे. सर्व प्रकारच्या तपासण्या अभियानात केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांकरीता जेवनाची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्णांची नोंदणी केली जाणार असून गंभीर आजारांच्या रुग्णाची पुढील तपासणी आरोग्य मेळाव्यात करुन रोगाचे निदान झाल्यानंतर पुढील उपचारही रुग्णांना देण्यात येणार आहेत. आरोग्य मेळावा यशस्वी होण्यासाठी आरोग्य यंत्रणेने समन्वयाने संपूर्ण नियोजन करावे. अशी सूचना यावेळी खासदार ॲड. संजय धोत्रे यांनी केली. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : ‘शहर समृद्धी उत्सव अभियाना’ संदर्भात मार्गदर्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola