दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना दिल्ली काँग्रेसमध्ये मतभेद उफाळून आले असून पक्षाचे दिल्ली अध्यक्ष अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपशी सर्वशक्तीनिशी दोन हात करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला यामुळं धक्का बसला आहे.
केंद्रातील सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं सध्या समविचारी पक्षांशी जुळवून घेण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्याचाच भाग म्हणून दिल्लीतील आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजय माकन यांचा या आघाडीला विरोध होता.
मात्र, त्यांच्या विरोधाला पक्षात फारसं महत्त्व मिळत नव्हतं. त्यामुळं नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला आहे. माकन यांच्या राजीनाम्यामुळं आप-काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असं मानलं जात आहे. राजीनाम्यानंतर माकन यांनी एक ट्विट करून काँग्रेस कार्यकर्त्यांचे व राहुल गांधींचे आभार मानले आहेत. दिल्ली काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून गेली चार वर्षे मला सर्वांचं सहकार्य मिळालं. पक्ष अडचणीत असताना ही जबाबदारी सांभाळणं सोपं नव्हतं,’ असं माकन यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : अभिनेता प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola