तेल्हारा- येथील स्थानिक मिलिंद नगर मध्ये मिलिंद मंडळातर्फे 201 वा भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला परिसरातील भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले सर्व फौजी बांधव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला मिलिंद मंडळाच्या कार्यकारिणी तर्फे महापुरुषांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. सुगतानंद संघा तर्फे बुद्ध वंदना घेण्यात आली.
मिलिंद मंडळातील युवकांनी अतिशय सुरेख अशी भीमा कोरेगाव च्या विजय स्तंभाची 20 फूट उंच प्रतिकृती तयार केली होती. या ठिकाणी आयु. अरुण हिवराळे, आयु. प्रमोद तायडे, आयु. सुनील बोदडे, आयु. उमेश गायगोळ या सर्व फौजी बांधवां तर्फे स्तंभाच्या प्रतिकृतीला पुष्प चक्राने गौरविण्यात आले. यावेळी योगेश सरदार व सागर वानखडे या विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनर ची सलामी दिली.
त्यानंतर उपस्थित सर्व जनसमुदायाने विजय स्तंभाला मानवंदना दिली आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर सुगतानंद संघाचे मनिषकुमार तायडे यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात भिमा कोरेगावच्या लढाईची ऐतिहासिक पार्श्वभुमी सांगुन उपस्थित युवावर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी तेल्हारा तहसील चे मंडळ अधिकारी आयु. सुभाष सावंग त्याच प्रमाणे अशोका फौंडेशन चे आयु. अनिल तायडे , आयु. संजय तायडे, आयु. उमेश वानखडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष बोदडे, रितेश तायडे, अक्षय दामोदर, सागर तायडे, मिलिंद हिवराळे, प्रशांत तायडे, आनंद हिवराळे, विक्की राजपूत व मिलिंद मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola