अकोला : अकोला महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महापौर विजय अग्रवाल आणि आयुक्त संजय कापडणीस यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती विशाल इंगळे, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार उपस्थित होते. या बैठकीमध्ये महापौर विजय अग्रवाल यांनी मनपातील सर्व विभागांमध्ये सुरूअसलेल्या कामकाजाची माहिती घेतली. अकोला शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचे व पिण्याच्या पाण्याची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम, २० कोटी निधी अंतर्गत शहरामध्ये एल.ई.डी.लाईट लावण्याचे काम सुरु असल्याची माहिती यावेळी संबंधित विभागप्रमुखांनी दिली.
शहरातीलनागरिकांना नळाचे चुकीचे देयक येत असल्यामुळे ते दुरुस्त करुन देणे, शहरातील नळ जोडणीवर मिटर बसविण्याचे काम पूर्ण करणे यासंदर्भात महापौर विजय अग्रवाल यांनी सूचना दिल्या. जे.सी.बी. मशीन दोन शिफ्टमध्ये चालविणे, मालमत्ता कर विभागातील न्यायालयांतील प्रकरणे लवकर निकाली काढणे,शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिकमणे कायमस्वरुपी काढणे, शहरातील अनाधिकृत जाहिरात होर्डिंगग्सकाढून ते लावणाऱ्यांविरुध्द पोलिस तकार करणे,दलितेतर व नगरोत्थानचे वर्क ऑर्डर झालेल्या कंत्राटदारांना काम त्वरित सुरु करण्याबाबत सांगणे,दलिवस्तीचे नवीन प्रस्ताव तयार करणे, ज्या रस्त्यांच्याकामांमध्ये विलंब होत आहे त्या कामांची शासनाकडून मुदतवाढ घेणे, प्रिकॉस्ट नाली व धापे यांच्या निविदा काढणे, सर्व डी.पी. रस्त्यावरील अतिकमणेकाढण्याबाबतही महापौर विजय अग्रवाल यांनी सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्यात.
आयुक्त संजय कापडणीस यांनी लोकसभा व त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी शासन निधी व इतर निधीच्या सर्व कामांमध्ये गती आणून कामे लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले. सर्व आरोग्यनिरीक्षकांनी युनिफार्म घालणे व मनपातील सर्व कर्मचा-यांनी ओळखपत्र घालणे बंधनकारक आहे. असे न आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला.
आपले अधिनस्त असलेले कर्मचारी वेळेत कार्यालयात यावे याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची असून यापुढे असे आढळून आल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार येईल, असेही आयुक्त यांनी सांगितले.
मालमत्ता कर वसुली विभागाची थकित कराची वसुली समाधानकारक नसून सर्व कर वसुली लिपिकांनी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ५० टक्के, व फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत ७५ टक्के वसुली तसेच मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत ९० टक्के वसुली आणणे बंधनकारक आहे. असे न झाल्यास त्यांची वेतनवाढ बाद करण्यात येईल व समाधानकारक वसुली करणाऱ्याकर्मचाऱ्यांना बक्षीसे देण्यात येतील, असे मनपा आयुक्तकापडणीस यांनी यावेळी सांगितले. बैठकीमध्ये अकोला मनपा उपायुक्त सुमंत मोरे, सहायकआयुक्त डॉ. दीपाली भोसले, पूनम कळंबे, शहर अभियंता सुरेश हुंगे, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहादूर,अनिल बिडवे, वासुदेव वाघाळकर, दिलीप जाधव यांच्यासह अकोला मनपातील सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : स्वच्छता सर्वेक्षण २०१९ : आयुक्तांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola