मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मुंबईतील अनेक क्रिकेटपटू आणि जाणकार उपस्थित होते. यावेळी सचिनने आपले गुरु आचरेकर सर यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी सचिन आणि सारेच क्रिकेटरसिक अत्यंत भावुक झाले.
प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना जेवताना त्रास होत असल्यामुळे अन्न पातळ करुन भरवले जात होते.
मात्र बुधवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधील एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केलं.
आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत. दरम्यान, द्रोणाचार्य व पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आचरेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने सरकारला त्यांच्या कार्याचा विसर पडला असल्याची भावना क्रिकेटवर्तुळात व्यक्त होत आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola