अकोला : अकोला शहरातील दहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. शहरातील खदान, रामदासपेठ, जुने शहर, डाबकी रोडसह इतरही पोलिस स्टेशनमध्ये या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शहरापासून जवळच असलेल्या व्याळा येथील सचिन त्र्यंबक वानखडे, गणेशनगरमधील डॉ. गणेश शिवराम मेहरे, वाशीम रोड येथील गजानन शालीग्राम शिरसाठ व मीरा दयाराम फुलवानी या महिलेच्या कुटुंबातील सहा जणांसह एकूण दहा अवैध सावकारांचा यात समावेश आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात या सर्वांविरुद्ध तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषगांने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाच पथकांनी संबंधित ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री ११ वाजता एकाचवेळी या सावकारांवर छापे टाकले. यांच्या घरातून १ लाख ३९ हजार ७२० रुपये रोख, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये किमतीचे अवैध सावकारी व्यवहाराचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले.
याशिवाय शहरात शंभरपेक्षा जास्त अवैध सावकारी व्यवसाय करणारे असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अकोल्याच्या नानकनगरातील मीरा दयाराम फुलवानी या महिलेच्या घरातील सर्व सदस्य अवैध सावकारीच्या व्यवसायात असल्याचे छापा मारल्यानंतर स्पष्ट झाले. यामध्ये संबंधित मनीष फुलवानी, दयाराम फुलवानी, पूजा फुलवानी, निकिता फुलवानी यांचाही यात समावेश आहे.
अधिक वाचा : तीस हजारांच्या लाचप्रकरणी मनपा अभियंत्याला पकडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola