अकोला : कापलेल्या लाकडाची वाहतुकीच्या परवानगीसाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या अकोला वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी (आरएफओ) व आरोपीसाठी काम करणारा खाजगी व्यक्ती यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. एसीबी ने त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली आहे.
४६ वर्षीय तक्रारदार हे लाकडाचे ठेकेदार आहे. त्यांनी नियमानुसार लाकडे तोडून त्याच्या वाहतुकीसाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती. हि परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी आरएफओ राजेंद्र कातखेडे (४९), कांशीराम मनवर, (६४, निवृत्त वन मजूर ) यांनी १० हजार लाचेची मागणी केली या बाबत एसीबीने १ जानेवारी रोजी पडताळणी केली. त्यानुसार कातखेडे याने १० हजार रुपये स्वीकारले. तर त्याचा खासगी व्यक्ती याने वेगळी १ हजार रुपये मागणी केली. दबा धरून बसलेल्या एसीबीने दोघांनाही पैसे घेताना रंगे हात अटक केली. हि कारवाई एसीबीचे पोलीस उपाधीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
अधिक वाचा : मनपाने शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर काढले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola