अकोला : शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊन समृध्द करण्याच्या उद्देशाने मनपा अंतर्गत दीनदयाल योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून अकोला शहरात ’शहर समृद्धी’ उत्सव सुरु आहे. यासंदर्भात मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात समृद्धी उत्सव अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शहर प्रकल्प अधिकारी तथा मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला सहायकआयुक्त डॉ. दिपाली भोसले व जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक अलोक तेरनिया यांच्यासह विविध विभागाच्या योजना असलेल्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर यांनी केले.
प्रास्ताविकातून त्यांनी उपक्रमाबद्दलची शासनाची भूमिका स्पष्ट केली. बॅंकांविषयक असलेल्या जनधन योजना , प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना याबाबत संबधित जिल्हा अग्रणी बँकेचे अनिल डोंगरे यांनी सविस्तर माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री आवासयोजना अंतर्गत घरकुलाविषयी मनपाच्या सल्लागार संस्था शून्य कन्सल्टन्सीचे मुकेश जोगे यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थितांच्या शंकाचे निरासनकेले. यावेळी जिल्हा बाल संगोपन अधिकारी अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या मातृवंदना योजनेतील आर्थिक मदतीविषयी माहिती देऊन गरोदर मातांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान विषयीसुद्धा माहिती यावेळी देण्यात आली.
मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक गणेश बिल्लेवार,प्रमोद गायकवाड , डॉ. तुरकाने , अनिल राऊत,शहरातील सुमारे ५५ संस्थांचे आर्थिक वस्तीस्तर संघाचे पदाधिकारी, श्री श्री रवीशंकरचे मनोज शर्मा, रंजना पाटील, संगीता तिकोडे, दिपाली महल्ले, नीता वाकोडे,वैशाली काळे, नितेश वाघमारे, एकलव्य सुरले, दिनेश दहतोंडे आदींची उपस्थिती होती.
अधिक वाचा : मनपाने शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर काढले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola