तेल्हारा(विशाल नांदोकार) :- अकोल्यातील संपादक, उपसंपादक व पत्रकारांना आपल्या निवासस्थानी चाहपाण्याकरिताबोलावून अपमानजनक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आज २ जाने ला तेल्हारा तालुका पत्रकार संघाकडून तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देवून जिल्हाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
अकोल्याचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोरणा महोत्सवात संदर्भात अकोल्याचे संपादक तथा उपसंपादक यांना चहापाण्या करिता निमंत्रित केले त्यानंतर मोरणा उत्सवाच्या बातम्या आपल्या मनाप्रमाणे न प्रसिद्ध केल्या चे खंत मनात ठेवून चहा पाण्याकरता बोलावण्यात आलेल्या संपादक सह पत्रकारांना दूषित पाणी पाजून दूर करून अर्वाच्च भाषेत बोलून अपमानित केले तसेच काही वृत्तपत्रांची फेकफाक केली एका जबाबदार सनदी अधिकाऱ्यांनी पत्रकारांसोबत केलेले कृत्य अपमानास्पद तथा अशोभनीय आहे, जिल्हाधिकार्यांच्या या कृत्याचा तेल्हारा तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ढोकणे, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे तेल्हारा तालुका उपाध्यक्ष अनंत अहेरकर, रामभाऊ फाटकर, धर्मेश चौधरी, सत्यशील सावरकर, सदानंद खरोडे, प्रशांत विखे, विशाल नांदोकार, सुरेश सिसोदिया, अनिल जोशी, प्रवीण वैष्णव, अनिल अवताडे, अमित काकड, विद्याधर खूमकर, पंकज भारसाकळे, आनंद बोदडे, निलेश जवकार, रवींद्र राउत, कृष्ण फंदाट, प्रदीप वाघ, विलास बेलाडकर, आशिष वानखडे, प्रेमसागर वानखडे, अर्जुन खिरोडकार, रवींद्र शर्मा, नाना इंगोले, संजय हिवराळे, राहुल मिटकरी, यांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : मोर्णा महोत्सवात मनाजोगी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याचा उद्दामपणा!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola