नवी दिल्ली : गोव्यातील मंत्री विश्वजित राणे यांचे एका व्यक्तीसोबतचे संभाषण व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राफेल प्रकरणातील सर्व फाईल्स आणि कागदपत्रे मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.
सुरजेवाला यांनी व्हायरल झालेली क्लिप पत्रकार परिषदेमध्ये सादर केली. या क्लिपमध्ये पर्रिकर राफेल प्रकरणी सर्व पुरावे माझ्या बेडरुममध्ये आहेत असे म्हणत असल्याचे विश्वजित राणे समोरील व्यक्तीला सांगत आहेत. याचाच अर्थ कागदपत्रे त्यांच्याच ताब्यात आहेत, असा दावा सुरजेवाला यांनी केला.
दरम्यान त्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज त्यांचाच आहे की नाही याचा उलघडा होऊ शकलेला नाही. राणे संवाद करत असलेली समोरील व्यक्ती कोण आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ झाले नाही. भाजपने या प्रकरणावर काँग्रेस चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला. यामुळे चौकीदार चोर असल्याचे सिद्ध होते असा हल्लाबोल सुरजेवाला यांनी केला. ते म्हणाले की, आता पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे, पर्रिकरांच्या बेडरुममध्ये नेमकी कोणती गुपित लपवली आहेत याची माहिती दिली पाहिजे.
गोवा के मंत्री विश्वजीत राणे की बातचीत से साफ है कि गहमागहमी के बीच CM, श्री मनोहर पार्रिकर ने कथित रूप से कहा कि कोई उनका कुछ नहीं कर सकता व राफेल की सारी फाईलें उनके पास हैं।
ज़रूर सुने: https://t.co/rNXKplpnTL#RafaleAudioLeak
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 2, 2019
पर्रिकरांना पंतप्रधान का घाबरत आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तरे दिली पाहिजेत, माध्यमांच्या प्रश्नांना वगळून पंतप्रधान बंदिस्त मुलाखती देत आहेत. या सर्व प्रकरणांमुळे राफेल प्रकरणात सरकार संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीसाठी तयार होत नसल्याचे सुरजेवाला म्हणाले. राफेलच्या सर्व फाईल्ससह पर्रिकर यांनी समोर आले पाहिजे असेही सुरजेवाला यांनी नमूद केले.
अधिक वाचा : राफेल प्रकरण: यशवंत सिन्हा, अरूण शौरीं कडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola