बुलडाणा : बुलडाणा मागील वर्षी शेतकऱ्यांनी विकलेल्या उडीद, मूग, हरभरा व तुरीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी निवेदने देत, आंदोलन करून हा प्रश्न लावून धरला. त्यानंतरही दखल घेतली न गेल्याने संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी चिखली जिनिंग-प्रेसिंगच्या कार्यालयावर धडक देत कार्यालयाला आग लावली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नाफेडची सब एजन्सी म्हणून चिखली जिनिंग प्रेसिंगची नियुक्ती करण्यात आली होती.
महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यांचे उडीद, मूग, तूर, हरभरा खरेदी करण्यात आले होते. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात विकलेल्या उडीदाचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. तर मागील मार्च महिन्यातील खरेदी केलेल्या तुरीचे व हरभऱ्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. ही रक्कम देण्यास चिखली जिनिंग-प्रेसिंग एक वर्षापासून चालढकल करीत आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देवून तसेच आंदोलने करूनही प्रशासनाने कारवाई केली नाही.
याउलट ‘पैसे न देता तुमचा माल घेवून जा’ अशा शेतकऱ्यांना धमक्या देत होते. मंगळवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्ह्यातत स्वाभिमानी अत्यंत आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. अनेक ठिकाणी रस्तारोको व निदर्शने करून प्रशासनाला धारेवर धरले. तर तीन ठिकाणी एसटी बसेसची तोडफोडही कार्यकर्त्यांनी केली.
चिखलीत कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयच पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे. कार्यालये चहा-पाण्यासाठी नाहीत. शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अजून तीव्र होणार असून चिखलीचे खरेदी-विक्रीचे कार्यालय स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जाळले आहे.
अधिक वाचा : थर्टी फर्स्टला बुलढाण्यात दुधाचे वाटप करुन केले नववर्षाचे स्वागत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola