अकोला : शहर विद्रुपीकरण करणाऱ्याविरुद्ध मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नवीन वर्षाच्या पहिल्याचा दिवशी कारवाईचा बडगा उगारला. शहरात विनापरवाना लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर्स, बोर्डस्, मोठे जाहिरात फलक काढून दणका दिला आहे.
सदर कारवाई टॉवर चौक ते जठारपेठ, अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन चौक, नेहरू चौक तसेच अशोक वाटिका चौक परिसरात करण्यात आली. विद्युत खांबावर लावण्यात आलेले ट्युशन क्लासेसचे अनाधिकृत फलकही काढण्यात आले. कोठडी बाजारातील दुकानांसमोरील अतिक्रमित ओटे व टिन शेड देखील काढण्यात आले.
सिटी कोतवाली ते न्यू बस स्टँड, चौपाटी, जैन मंदिर परिसर, फतेह चौक या परिसरात रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, कपडे विक्रेत्यांचे स्टॉल, किरकोळ विक्रेत्यांचे दुकाने तोडण्यात आली. सदर कारवाई अकोला मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये, मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात अतिक्रमण विभागातील प्रवीण मिश्रा, संजय थोरात, नरेश बोरकर, विजय बडोणे, प्रवीण इंगोले, प्रवीण कावळे, प्रेमचंद खंदारे, सय्यद रफिक आदींनी केली.
अधिक वाचा : नव्या वर्षात पूर्णा, अकोला रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola