मुंबई : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात मोठा घोटाळा उघड झाला आहे. इटलीच्या न्यायालयाने या प्रकरणी दोषींना शिक्षाही सुनावली आहे. या प्रकरणातील दलाल ख्रिश्चयन मिशेल याच्याकडे केलेल्या चौकशीत, त्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) न्यायालयात दिली आहे. यावर आता गांधी कुटुंबानं स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात ख्रिश्चयन मिशेल हा महत्वाचा माणूस आहे. आता त्याच्या चौकशीत या घोटाळ्यातील अनेकांची ओळख पुढे येऊ लागली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माझ्यात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप फडणवीस यांनी केला आहे.
अधिक वाचा : खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्याना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola