अकाेला- कीटकनाशक फवारणीतून यंदा एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत ३१० जणांना विषबाधा झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. विषबाधेमुळे शेतमजूर मृत्युमुखी पडल्यानंतर आता याप्रकरणी शासनाच्या निर्णयानुसार संबंधित शेतमालकावरच कारवाईची टांगती तलवार आहे. विषबाधेचा आकडा वाढतच असल्याचे नाेटीस मिळण्याच्या शक्यतेने शेतमालक धास्तावले आहेत.
गत वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील किटकनाशकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर हेच लाेण अकाेला जिल्हयातही पसरले हाेते. त्यानंतर अकाेला जिल्ह्यातही गतवर्षी किटकनाशक फवारणीतून विषबाधेमुळे १२ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाल्याचे उजेडात आले हाेते.परिणामी यंदा किटकनाशक फवारणीबाबत शासनसह सर्वच यंत्रणांकडून जनजागृति करण्यात आली.
आराेग्य यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या हाेत्या. परिणामी गतवर्षीच्या तुलनेने यंदा किटकनाशकामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण घटले असले तरी विषबाधा हाेण्याचे प्रमाण कमी हाेत नसल्याचे दिसून येत आहे.
फवारणीतून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी कार्यवाहीसाठी १२ ऑक्टाेबर २०१७ राेजी शासनाने परिपत्रक जारी केले हाेते. किटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी, शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच हातमाेजे, चष्मा, मास्क, टाेपी, अॅप्राॅन, बुट इत्यादिचा वापर कटाक्षाने करावा, शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करताना स्वत:ला, घरातील कुटुंबियांना अथवा शेतमजुरांना विषबाधा झाल्यास प्रथमाेपचार करण्याच्या दृष्टीकाेनातून प्रथमाेपचाराचे सािहत्य शेतावर उपलब्ध ठेवावे आदीसह अनेक मुद्यांचा उहापाेह करण्यात आला हाेता. विषबाधा झाल्यास त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी संबंधित शेतमालकाची राहील, असेही त्यात नमूद करण्यात हाेते.
काही ठिकाणी एप्रिलनंतर (मान्सूनपूर्वी कपाशीसह काही पिके) साधरणत: फवारणी सुरु हाेते. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत किटकनाशक फवारणीमुळे बाधित, उपचार व मृत्यूची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. बािधत संख्या:- ३१०, बरे झालेले -३०६,मृत्युमुखी:- ३, उपचार घेत असलेले:- १ व्यक्ती आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola