अकोला: वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके सातत्याने प्रलंबित राहत असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्याने त्याची दखल घेत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांच्या सूचनेवरून वेतन पथक अधीक्षकांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली असून १ जानेवारी रोजी प्रलंबित देयके सबंधितांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासीत केले आहे.
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके प्रलंबित असल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे आल्याने शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी अकोला माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात सभा बोलावून ही बाब मांडली. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकिय प्रतीपूर्तीची देयके तात्काळ निकाली काढण्यात यावेत अशा प्रकारची सूचना संगीता शिंदे यांनी दिली. कर्मचारी आपल्या किंवा कुटुंबाच्या आजारपणात आवश्यक असणाऱ्या खर्चासाठी रकमेची तरतूद अनेक मार्गांनी करून आपले काम भागवीत. इतरांचे घेतलेले देणे देण्याकरिता त्याला त्याची प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ अदा होणे गरजेचे आहे.
परंतू प्रशासनाकडून यामध्ये सतत दिरंगाई होत असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यापुढे वैद्यकीय देयके तात्काळ अदा करण्यात यावीत अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याची मागणी यावेळी संगीता शिंदे यांनी लावून धरली. त्यामुळे त्यांच्या सूचनेची दखल घेऊन अधीक्षक वेतन पथक अकोला यांनी लगेचच यंत्रणा कामाला लावून येत्या 1 जानेवारी 2019 रोजी सर्व प्रलंबित वैद्यकीय देयके तसेच देयक रक्कम कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही आरंभ केली आहे.
त्यामुळे नवीन वर्षात सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकिय प्रतीपूर्तीची देयके मिळणार आहेत. यावेळी विभागीय अध्यक्ष प्रा अशोक भराड सर व संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रकाश हरणे सर व अकोला जिल्हा सचिव एस बी गावंडे सर संघटनेचे विधी सल्लागार प्रा चंद्रशेखर म्हैसने सर, अकोला जिल्हा सचिव एस बी गावंडे सर,प्रसिद्धी प्रमुख श्री मुशीर सर, सचिव विकास दिवे सर,कार्याध्यक्ष शरद तिरमारे सर ,आकोट ता अध्यक्ष निलखंड म्हैसने सर,अनिल बोंडे सर,आकोट ता मार्गदर्शक संदीप ऊन्होने सर,विजय ढोणे पाटील सर,अजित सपकाळ सर व अनेक अतिरिक्त शिक्षक व इतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola