तेल्हारा (अमित काकड) :- रास्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शेगांव नाका तेल्हारा येथे तेल्हारा पोलिसांची नाकाबंदी चालू असताना तेल्हारा पोलिसांनकडून ड्रिंक अँड ड्राईव्ह ची पहिली कार्यवाही दि २८ डिसेंम्बर रोजी ०७:३० वाजताचे दरम्यान करण्यात आली.
तेल्हारा येथे रास्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत तेल्हारा पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना आरोपी नामे गणेश निवृत्ती वाघमारे रा.पिंपळगाव राजा हा आपला ऑटो क्र एम एच २८ टी १३७८ दारूच्या नशेत चालवीत असतांना मिळून आला त्याची बीप अनालायझर यंत्राचे सहाय्याने तपासणी केली असता वाहन चालकाचे अल्कोहोल २१० पॉझिटिव्ह मिळून आल्यावरून तेल्हारा पोलिसांनी भादवीच्या कलम १८५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे स्वतः करीत आहेत. सदर कार्यवाहीचा सपाटा ८ जानेवारी पर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती मिळाली.
अधिक वाचा : तेल्हारा येथील माजी नगरसेवक आत्महत्या प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola