अकोट (प्रतिनिधी) :- अकोट तालुक्यातील पणज ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदावर असलेल्या रतन शिंदे यांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार अकोट तालुक्यातील पणज ग्रामपंचायत मधील ७०हजाराचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या रतन शिंदे नामक शिपायाने पणज ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, उपचारासाठी त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील हकीकत अशाप्रकारे आहे की,रतन शिंदे याला ७०हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून निलंबित करण्यात आले होते. परंतु या कथित अफहाराची कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार पंणज ग्रामपंचायत सचिव यांनी गटविकास अधिकारी किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडे करण्यात आली नव्हती,तरीसुद्धा आपल्याला कोणत्या कारणांमुळे निलंबित करण्यात आले होते,याची विचारणा रतन शिंदे यांनी वारंवार केल्यावरही, त्यांना कोणतेही लेखी किंवा तोंडी उत्तर देण्यात आले नाही. शेवटी आज ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत रतन शिंदे पोहचले, त्याठिकाणी सुद्धा त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नसल्याने,त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या बॉटल मधील विष भर ग्रामसभेत घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने,खळबळ उडाली असून,रतन शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून,रतन भीमसिंग शिंदे यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बाहाकार करीत आहेत.
अधिक वाचा : अकोट वाहतूक पोलीस दादांची माणुसकी हरवलेल्या चिमुकलीला सुखरूप पोहचवले घरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola