अकोला : अकोला येथे २८ ते ३० डिसेंबर दरम्यान ‘मोरणा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाची मेजवाणी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. याच महोत्सवांतर्गत शनिवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता अकोल्यातील सुप्रसिद्ध खवय्या नीरज आवंडेकर हे एकाचवेळी तब्बल एक हजार किलो पोहे बनवण्याचा विक्रम करणार आहेत.
अकोला येथे अद्यापपर्यंत खवय्येगिरीशी संबंधित कुठलाही मोठा उपक्रम झालेला नाही. त्यामुळेच या पोहे बनवण्याच्या विक्रमाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. नागपूर येथील सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्यापासून प्रेरणा घेऊन नीरज हे हा उपक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या उपक्रमासाठी स्थानिक शास्त्री स्टेडियमवर दहा फूट बाय दहा फुटाची महाकाय कढई, मोठे सराटे, पोहे भिजवण्यासाठीचे पातेले, असे सर्व साहित्य ठेवण्यात आले आहे. याचदिवशी तेथे कालाध्यापक संघातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेसाठी विविध शाळांतील जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तयार केलेले १ हजार किलो पोहे या स्पर्धेकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना व उपस्थितांना वितरित करण्यात येणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola