अकोला : अकोला शहरात २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या मोर्णा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने लालबहादूर शास्त्री स्टेडियमच्या बंद प्रवेशद्वारासमोरचे अतिक्रमण काढल्याने या प्रवेशद्वारांना मोकळा श्वास घेतला. तब्बल चार वर्षानंतर ही अतिक्रमणे काढण्यात आल्याने स्टेडियमचे सौंदर्यही खुलले आहे.
मोर्णा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोल्याचे जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी लाल बहादूर शास्त्री स्टेडियमची पाहणी केली. स्टेडियमचे दोन प्रवेशद्वार प्रवेशासाठी खुले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी पांडेय यांना पाहणीत स्टेडियमला चार प्रवेशद्वार असल्याचे लक्षात आले.
मात्र, अतिक्रमणाचा विळखा असल्याने अन्य दोन प्रवेशद्वारे दिसेनासे झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अतिक्रमण निर्मूलन पथकाला पाचारण करून सर्व अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिलेत. वेळ मिळताच तेथील काही अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण हटविले. ज्यांच्या जुन्या नादुरुस्त गाड्या गेटसमोर उभ्या होत्या त्या बुलडोझरच्या साहाय्याने हटविण्यात आल्या आणि स्टेडियमचा मार्ग मोकळा करण्यात आला.
अधिक वाचा : अकोल्यातील गुणवंत विद्यार्थिनीचा उपमहापौरांच्या हस्ते सत्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola