मागील काही काळापासून चर्चेत असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. या चित्रपटात अनुपम खेर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत. संजय बारु यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर चित्रपटाची कथा आधारीत आहे.
युपीए सरकारच्या २००४ ते २०१४ या काळातील राजकीय घडामोडींचे चित्रण या चित्रपटात आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारु यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ पुस्तकाची चर्चा झाली होती. आता या पुस्तकावरच चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
Ladies and Gentlemen!! Presenting the trailer of our highly anticipated film #TheAccidentalPrimeMinister. ??
The Accidental Prime Minister | Official Trailer | Releasing January 11 … https://t.co/TUu4AsTgHM— Anupam Kher (@AnupamPKher) December 27, 2018
चित्रपटात अक्षय खन्नाने संजय बारु यांची भूमिका साकारली आहे. तर, सोनिया गांधी यांची भूमिका सुझैन बर्नट यांनी सोनिया गांधींची व्यक्तीरेखा साकारली आहे. त्याशिवाय प्रियंका गांधी यांची भूमिका आहना कुमरा, डॉ. मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण कौर यांची भूमिका दिव्या सेठी आणि राहुल गांधींची भूमिका अर्जुन माथुर यांनी साकारली आहे. विजय गुट्टे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ११ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अधिक वाचा : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola