नवी दिल्ली : भारताचा आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावा याला अवैध शिकारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील मोतीपूर वनक्षेत्राच्या कटरनिया घाट परिसरात अवैध शिकार केल्याचा रंधावावर आरोप आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीत रंधावाचाही सहभाग होता. अवनीच्या शिकारीवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
ज्योती रंधावा याच्या गाडीतून पोलिसांनी एक पॉइंट २२ राफल जप्त केली आहे. यासह वन्यप्राण्यांचे काही अवशेषही सापडले आहेत.
रंधावा याचा मोतीपूर भागात एक फार्म हाउस आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो आपल्या गाडीतून या भागात फिरत होता. त्याच्या सोबत असलेल्या माणसांची वर्तणूक संशयास्पद आढळून आली. यानंतर त्यांना जंगलातही बघितलं गेलं होतं, अशी माहिती दुधवा वनक्षेत्राचे संचालक रमेश पांडे यांनी दिली.
अधिक वाचा : टोईंग पथकाच्या कारवाईत वाढला अतिरेकपणा आधी वाहतूक शाखेने पिवळ्या रंगाचे पट्टे तयार करावे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola