अकोला : अकोलाजवळील गायगाव येथे गणपतीच्या मूर्तीला ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजची वेशभूषा केल्याने गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले झाले आहे. अकोलापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गायगाव येथे अग्रवाल कुटुंबीयांच्या खासगी मालकीचे गणपती मंदिर आहे. ख्रिसमस निमित्त गणपतीच्या मूर्तीला सांताक्लॉजच्या रूपात सजवण्यात आले आहे. मात्र गणेशभक्तांनी याला जोरदार आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, सांताक्लॉजचे कपडे घालून देवाचा अपमान केल्याचा आरोप करत मंदिर प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा गणेशभक्त, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
अधिक वाचा : महानगरपालिकेने लावलेला अवास्तव कर रद्द करण्यात यावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola