अडगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु. येथे समग्र शिक्षा अभियान व (NSDC) अंतर्गत २०१५ पासून व्यवसाय शिक्षण( रिटेल व हेल्थकेअर) सुरू झाले आहे.वर्ग ९ पासून ते १२ वी पर्यंत हे विषय घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत.जिल्हा परिषद विद्यालय आडगाव बुद्रुक येथील वर्ग बारावीच्या च्या रिटेल च्या विद्यार्थ्यांचि व्यवसाय पूर्व प्रशिक्षण ( इंटर्नशिप ) बी-मार्ट बिग बाजार अकोट येथे सुरु करण्यात आली.
विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना इंटरसची दिली जात आहे.इंटरशिप मध्ये जिल्हा परिषद विद्यालयातील रिटेलच्या ११ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इंटर्नशिप दरम्यान विद्यार्थ्यांनी रिटेल दुकानातील कामकाज कसे चालते,दुकानांमध्ये आलेल्या ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्तापित करून त्यांना निष्ठावंत ग्राहक बनविणे.
पॉइंट ऑफ सेल वरील रोखपालांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या .वस्तू स्कॅन करणे,बिल तयार करणे दुकानांची रचना व दुकानात वस्तूंची मांडणी कशी करावी , ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांमध्ये करण्यात येणारी सजावट.सीसीटीव्ही कॅमेरे,नोट काऊंटिंग मशीन,पॅकेजिंग, सेल्फ सर्व्हिस तसेच ग्राहकांचे समाधान इत्यादी महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपदरम्यान शिकले . बी-मार्ट बीग बाजार अकोटचे संचालक श्री राजेश भंडारी सर तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दुकानातील कामकाजा विषयी माहिती दिली. इंटर्नशिप पूर्ण करण्या करिता विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय भारसाकळे सर,लेंड ए हॅण्ड चे समन्वयक श्री प्रकाश पाटील सर, एम्पावर प्रगतीचे समन्वयक श्री अंकुर बनसोड सर व रिटेल व्यवसाय शिक्षक अभिजीत लोखंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत अकोल्याच्या पाच जणांची वर्णी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola