तेल्हारा(प्रतिनिधी) :- संघटना शक्तिशाली बनवायची असेल तर गोर गरिबांची सेवा करून समाजकार्य करा असे प्रतिपादन आ.संजय कुटे यांनी 25 डिसेंबरला तेल्हारा येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज व्यायाम शाळे मध्ये कुणबी युवक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले आ.संजय कुटे तेल्हारा येथे आले असता त्यांनी जुन्या शहरामधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज व्यायाम शाळेला सदिच्छा भेट दिली या वेळी कुणबी युवक संघटनेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला या वेळी आ.संजय कुटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की तेरवी सारख्या प्रथा बंद करा सर्वांना सोबत घेऊन गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे प्रयत्न करा असे सांगितले आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्ञानुभाऊ राऊत होते सूत्र संचालन उज्वल दबदघाव यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून जानराव बांपु लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे, माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुदेश शेळके, अजाबराव मानकर ,अनील तायडे, पुरुषोत्तम आवारे, सुधाकर खुमकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमला कुणबी युवक संघटनेचे तालुका अध्यश आशिष शेळके, नानाभाऊ इंगोले, राजेश काटे, गजानन गायकवाड, मंगेश ठाकरे, प्रदीप कोरडे, अनिल तायडे, अतुल दबदघाव, विशाल नांदोकार, गोकुळ हिंगनकर, निलेश जवकार, वैभव गावंडे, वैभव मिरगे, सुधाकर हागे, अंकुश बुर घाटे, उज्ज्वल दबडगाव, रावि इंगळे, बंटी राऊत, विठ्ठल राऊत, आकाश फाटकर, विठ्ठल मामनकार, शुभम टीकार, नितीन मानकर, ओंकार गावंडे, विनोद गावंडे, कैलास आमटे, तुषार ठाकूर, राहुल भिवटे, राहुल कोरडे, तुषार ठाकुर, प्रकाश बोरसे, राजेश वानखडे, विनोद गावंडे, अशय सुरे, उदय गावंडे, ऋतिक मानकर, लखन सोनटक्के, कैलाश आमटे, वैभव शेळके, प्रज्वल जामोदे इत्यादी कुणबी युवक संघटनेचे व संत तुकाराम महाराज व्यायाम शाळेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंत्युत्सवास शिवाजी हायस्कूल व श्रीमती पार्वतीदेवी तापडीया
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola