अकोला (प्रतिनिधी) : संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ अकोला जिल्ह्याच्या वतीने समाजातील अनिष्ठ चालीरीतीपासून समाजाला परावृत्त करणे, शैक्षणिक दृष्टीच्या विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन, युवकांना सामाजिक, शैक्षणिक व्यवसायभिमुख मार्गदर्शन अशा वैचारिक मेळावा प्रमिलाताई ओक हॉल, अकोला येथे उत्साहात पार पडला.
यावेळी विनामुल्य दिनदर्शिकेचे हभप संजय कुटे यांचे अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. पराग टापरे, सुरेश ठाकरे, श्रीकृष्ण तऱ्हाळे, मधुकर राव घोंगे, लोड गुरुजी, मयूर दतकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून युवकांनी प्रशासनात झेप घ्यावी, असे प्रा. विवेक हरिभाऊ हिवरे यांनी सांगितले.
समाज संघटित झाल्याशिवाय राजकीय, शैक्षणिक , आर्थिक सत्ता मिळविणे कठीण असल्याचा सूर मान्यवरांच्या मनोगतातून दिसून आला. संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ चे अध्यक्ष सुभाष दातकर यांनी प्रस्तविकातून विधायक कार्यात समाजाकडून सहकार्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. ज्ञानदेवराव ठाकरे, माजी आ. नारायणराव गव्हाणकर, जिल्हा शिक्षण संचालक मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय कौसल, जी. प. सदस्य शोभा शेळके, अजिंक्य टापरे, अनिता आखरे, कवियित्री वनिता गावंडे, माया डीवरे, किसान क्रांती सेवाचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे, आपचे जिल्हाध्यक्ष शिवा गोंड, आदींनी मनोगत व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी सोहळ्यास शुभेच्छा संदेश पाठवला. हभप. संजय कुटे महाराज यांनी संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ चे अध्यक्ष सुभाष दातकर यांचा आशीर्वादपर सत्कार केला. अध्यक्षीय भाषण हभप. संजय कुटे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष विश्वनाथ तिव्हाणे, बाळकृष्ण दिवाने, कोषाध्यक्ष प्रशांत तऱ्हाळे, सहकोषाध्यक्ष नीलकंठ तोळे, कार्याध्यक्ष शिवाजी काळे, सहकार्याध्यक्ष संजय मेतकर, वामनराव आखरे, गजानन परकाळे, गजानन निर्मळे , रवींद्र कुकडे, अरविंद मानकर, यांनी परिश्रम घेतले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola