तेल्हारा (तालुका प्रतिनिधी) : श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी भाऊसाहेब देशमुख जयंत्युत्सवा निमित्त स्नेहसमेलन व विविध कार्यक्रम आज दिनांक २४ डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे सहा दिवस चालणाऱ्या या जयंत्युत्सवा ची सुरुवात ध्वजारोहनाने करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी हायस्कूल मुख्याध्यापक सुभाषराव ढोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य रमेशराव कोकाटे , शाळेचे माजी मुख्याध्यापक एस आर विखे,आर एस वाकोडे दैनिक देशोन्नती चे तेल्हारा तालुका प्रतिनिधी अनंत अहेरकर , श्रीमती पार्वतीदेवी तापडिया कान्व्हैट च्या प्राचार्या सौ विद्याताई अ देशमुख विद्यालयाचे पर्यवेक्षक गजानन भारसाकळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी आजीव सभासद रमेशराव कोकाटे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर प्रमुख अतिथी चे हस्ते डा पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर एस वाकोडे यांनी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषराव ढोले यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले संचालक जयंत्युत्सव प्रमुख शांती कुमार सावरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकेश भाबुरकर जयंती उत्सव प्रमुख यांनी केले आहे.कार्यक्रमाला श्री शिवाजी विद्यालयात चे सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.
अधिक वाचा : तेल्हारा तहसील कार्यालय समोर विधवा महिलेचे उपोषण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola