अकोला : महानगरपालिका मालमत्ता जप्ती पथकाने थकीत करापोटी शहरातील सातव चौक, येथील सतनाम अपार्टमेंट मधील समीर अशोक वर्मा यांची मालमत्ता सील केली. त्यांच्याकडे सन २०१५ पासून एकूण ५६,५८३/- मालमत्ताकर थकीत आहे. त्यांना थकीत कराचा भरणा करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून वारंवार सूचना व नोटीस दिल्यावरही त्यांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपा उपआयुक्त सुमंत मोरे यांच्या आदेशान्वये व कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात समीर अशोक वर्मा यांची मालमत्ता सील करण्यात आली. या वेळी महापौर विजय अग्रवाल व मनपा उपयुक्त सुमंत मोरे यांनी नागरिकांनी आपला थकीत तसेच चालू मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून मालमत्ता जप्ती सारखी अप्रिय घटना टाळून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले. ही कारवाई जप्ती पथक प्रमुख सै.मुमताज अली, सहायक कर अधीक्षक प्रशांत बोळे, वॉरंट दरोग प्रकाश कपले व मोहन घाटोळ, वसुली लिपिक भीमसिंग ठाकूर, सुरक्षा रक्षक श्रावण वाहाने, शोभा पांडे, तेजराव तायडे आदींच्या पथकाने केली.
अधिक वाचा : टोईंग पथकाच्या कारवाईत वाढला अतिरेकपणा आधी वाहतूक शाखेने पिवळ्या रंगाचे पट्टे तयार करावे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola