अकोला – निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली आज नियोजन भवनात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली देवकर, उप विभागीय अधीकारी निलेश अपार, प्रा. संजय खडसे, उदय राजपूत अभय मोहिते, सर्व तहसीलदार, राजकीय पक्षाचे प्रीतिनिधी, प्रशिक्षणाचे मास्टर ट्रेनर, संबधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आगामी निवडणुकीत मतदानयंत्रासोबत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. या यंत्रांचा उपयोग आणि विश्वासार्हतेबाबत जिल्ह्यात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृती अभियानाचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे, त्याची प्रात्यक्षिके पाचही विधानसभा मतदारसंघात दि. 26 डिसेंबरपासून दाखवली जाणार आहेत. प्रात्यक्षिकांच्यावेळी नागरिकांच्या शंकांची उत्तरे दिली जाणार आहेत. आज जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकासाठी राखीव असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटची पाहणी करून त्या संबंधित प्रशिक्षण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावोगावी जनजागृतीसाठी देण्यात आल्या. यानंतर नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत श्रीमती देवकर यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी मास्टर ट्रेनरने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट कशा पध्दतीने वापारायचे याचे प्रात्यक्षिकासह हाताळणी केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट याबाबतची माहिती व्हावी यासाठी निवडणूक विभागातर्फे दि. 26 डिसेंबरपासून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातंर्गत जिल्हा प्रशासनातर्फे गावोगावी जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबतची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अकोला जिल्हयातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पुर्व व मुर्तिजापूर या विधानसभा मतदार संघात एकुण 1680 मतदान केंद्र आहेत. अकोट येथे 331 , बाळापूर- 335, अकोला पश्चिम- 283, अकोला पुर्व- 350 , मुर्तिजापूर- 381 मतदान केंद्र आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी जिल्हयात प्रत्येक मतदार केंद्रासाठी 5 पथक असे एकुण 25 पथके गठीत करण्यात आली आहे. यापैकी प्रत्येक मतदार संघासाठी दोन याप्रमाणे एकुण 10 पथके फिरते राहणार आहे. तसेच उपविभागीय स्तरावर एकुण 5 पथके कार्यरत राहणार आहे. तर 10 पथके राखीव राहणार आहे. जिल्हयामधील 5 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येक फिरते पथकासोबत 25 अधिकारी कर्मचारी व 5 पोलीस कर्मचारी राहणार आहे. यासाठी 5 मतदार संघांसाठी प्रत्येकी 2 याप्रमाणे 10 वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या वाहनासोबत मतदारांमध्ये जनजागृतीसाठी 2 एलसीडी संच राहणार आहे. सोबत लाऊडस्पीकरची व्यवस्था सुध्दा राहणार आहे.
अधिक वाचा : मतदार यादीची ओळख होण्यासाठी ‘विदयार्थ्यांचा एक दिवस मतदार यादीसोबत’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola