अकोला – विदयार्थ्यांना मतदार यादीची ओळख व्हावी, यासाठी आज महाविदयालयीन विदयार्थ्यांना मतदार यादीबाबत लोकशाही सभागृहात मार्गदर्शन करण्यात आले. ‘विदयार्थ्यांचा एक दिवस मतदार यादीसोबत’ असा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेनुसार सदर उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विदयार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन मतदार यादीची ओळख करुन घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) वैशाली देवकर, तहसिलदार विजय लोखंडे, बीएलओ आदींसह श्री शिवाजी महाविदयालय आणि एलआरटी कॉमर्स महाविदयालयाचे विदयार्थी उपस्थित होते. आपल्या लोकशाही प्रदान देशात निवडणुक ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रीया आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क संविधानाने दिला आहे.
मतदानाची प्रक्रीया कशी असते, मतदानासाठी काय करावे लागते, मतदार यादी म्हणजे काय मतदार यादी काय असते, ती कशी तयार करतात, आपला मतदान क्रमांक व मतदान केंद्र कसे शोधावे याची संपूर्ण माहिती विदयार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी ‘विदयार्थ्यांचा एक दिवस मतदार यादीसोबत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला.
आज झालेल्या कार्यक्रमात श्री. देवकर यांनी विदयार्थ्यांना प्रारुप मतदार यादीचे नुमने देऊन त्याबददल सविस्तर मार्गदर्शन केले. यादीमधील विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक व नाव, आरक्षण स्थिती, यादी भाग, विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात अंतर्भूत आहे त्या लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक व नाव आणि आरक्षण स्थिती, पुनरिक्षणाचा तपशील यामध्ये पुनरिक्षण वर्ष, अर्हता दिनांक, पुनरिक्षणाचा प्रकार, प्रसिध्दीचा दिनांक, यादी भाग आणि मतदान क्षेत्र तपशील, यादी भागाच्या हददीचा तपशील, मतदान केंद्राचा तपशील यात मतदान केंद्र अनुक्रमांक व नाव, मतदान केंद्राचे नाव व पत्ता, मतदार संख्या, एकूण मतदार संख्या याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. श्री. अपार यांनी मतदार यादी अचूक कशी तयारी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. फॉर्म क्र. 6 (नवीन मतदार नाव नोंदणी), फॉर्म क्र. 7 (मतदार यादीतून मयत मतदाराचे नाव वगळणे) व फॉर्म क्र. 8 (नाव, पत्ता, फोटोतील दुरुस्ती) याबाबत त्यांनी माहिती दिली.
तसेच विदयार्थ्यांनी मतदान यादीनुसार आपल्या मतदान क्षेत्रातील सेक्शन निहाय नकाशा तयार करण्याबाबत सूचित केले. यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे सहकार्य घेऊन सात दिवसांच्या आत नकाशा तयार करावा तसेच मतदार यादी अचूक करण्यासाठी बीएलओंनी विदयार्थ्यांचे सहकार्य घेण्यास त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले.
अधिक वाचा : अकोला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी विद्यार्थ्यांसोबत चाखली खिचडी चव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola