मुंबई- चालू आठवड्याच्या शेवटी सरकारी बॅंक कर्मचारी संपावर जाणार असल्याने पाच दिवस बॅंका बंद राहणार आहेत. बँक अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद राहणार आहेत.केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक आणि विजया बॅंक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून बॅंक कर्मचाऱ्यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच या संपावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.कर्मचारी 21 डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. ख्रिसमस आणि वर्षअखेरीस फिरायला जाणाऱ्यांना 21पूर्वीच पैशांची तजवीज करावी लागणार आहे. शुक्रवारी (ता. 21) संप, २२ ला चौथा शनिवार, २३ ला रविवारची सुटी, सोमवारी (ता. 24) बॅंका उघडतील. मात्र बहुतांश कर्मचारी रजेवर दिसतील आणि 25 तारखेला ख्रिसमसची सुटी असेल. बँका बंद असल्याने एटीएमवर ताण येणार आहे.
अधिक वाचा : मोबाईल नंबर, बँक खात्यासाठी आधार सक्ती नाही; दोन कायद्यांमध्ये सुधारणा होणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola