तेल्हारा (प्रतिनिधी) : तालुक्यातील भांबेरी येथील गौकर्णा बाई बाळकृष्ण बोदडे याचे पती बाळकृष्ण बोदडे याचा मृत्यु 6 सप्टेंबर 2018रोजी अती दारू सह त्यात विषारी औषध टाकुन व्यसन प्राशन केल्याचे कारणा मुळे त्याचा मृत्यु झाला असल्याचा आरोप सदर उपोषण कर्त्या महिलेने केला असून गावात आरोपी मोकाट फिरत असून त्याच्या पोलिस कार्यवाही करत नसल्याने सदर पिडीत महिलेने तेल्हारा तहसील कार्यलया समोर आमरण उपोषण करण्याची सुरुवात आज केली असून त्या बाबत चे निवेदन त्यानी पोलिस आयुक्त अमरावती पोलिस अधिक्षक अकोला पोलिस उपविभागीय अधिकारी अकोट ठाणेदार तेल्हारा यानी दिलेली असून सदर आता यावर काय कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे.
माझे पतीचा मृत्यु हा घाता पाताने झाला असून गावातीलच शुधोधन जगदेव बोदडे याच्या सह इतर 3त्यानी मिळुन केला असून मी पोलिसात तक्रार दिली असून परंतु त्यावर कार्यवाही होत नसल्याने मी आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे.- गौकर्णा बाई बाळकृष्ण बोदडे (पिडीत महिला)
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola