श्रीहरिकोटा : सर्वांधिक वजनदार जीसॅट-११ या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता जीसॅट-७ए या उपग्रहाचे बुधवारी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण केले.
भारतीय हवाई दलासाठी महत्वाच्या असणाऱ्या जीसॅट-७ए या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले. जीएसएलव्ही-एफ ११या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. त्यानंतर तो काहीवेळात भूस्थिर कक्षेत स्थिरावला. या कम्युनिकेशन उपग्रहामुळे हवाई दलाचे वेगवेगळे ग्राउंड रडार स्टेशन, हवाई तळ आणि विमाने इंटरलिंक होणार आहे. यामुळे हवाई दलाची संपर्क यंत्रणा आणि लढाऊ क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर यामुळे ड्रोन ऑपरेशनसाठी मदत होणार आहे.
याआधी इस्त्रोने विशेष करून नौदलासाठी जीसॅट-७ अर्थात रुक्मिनी या उपग्रहाचे २९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रक्षेपण केले होते. या उपग्रहामुळे हिंदा महासागरातील २ हजार नॉटिकल माईल क्षेत्रातील नौदलाची लढाऊ जहाजे, पानबुड्या आणि विमानावर देखरेख ठेवण्यास मदत झाली आहे. सध्या भारताकडे १३ लष्करी उपग्रहे आहेत. यात प्रामुख्याने रिमोट सेन्सिग उपग्रहांचा अधिक समावेश आहे. रिमोट सेन्सिग उपग्रहाचा उपयोग लष्कराने पाकिस्तान विरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईवेळी केला होता.
अधिक वाचा : देशाचे सर्वात वजनी उपग्रह जीसॅट-11 लाँच; इंटरनेट स्पीड वाढणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola