अकोला (प्रतिनिधी) : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईचा धसका अतिक्रमणधारकांनी घेतला आहे. शनिवारी अतिक्रमण पथकाने सिंधी कॅम्प येथील भाजी बाजारातील अतिक्रमण काढले आणि हा परिसर मोकळा केला.
भाजीबाजारात अतिक्रमण करण्यात आलेली दुकाने, हातगाड्या, ठेले, चहाटपऱ्या तोडण्यात आल्या. अतिक्रमणनिर्मूलन पथकाच्या कारवाईमुळेपरिसरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळेझाले. या वेळी गिट्टी खदान रोड वरीलचिकन विक्रेत्यांचे शेडही तोडण्यात आले.कच्ची खोलीमधील नारायण दूध डेअरीजवळील अतिक्रमित दुकानदेखिलतोडण्यात आले.
जिल्हा परिषदकार्यालयाची अतिक्रमित भिंतहीतोडण्यात आली शहरातील सिटी कोतवाली ते बसस्टँड,गांधी चौकातील चौपाटी, डॉ. बाबासाहेबआंबेडकर खुले नाट्य मंदिर, न्यू क्लॉथमार्केट, फतेह चौक, तसेच टॉवर चौक तेजठारपेठ, मोठी उमरी परिसरात मनपाच्याअतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाईकेली.
कारवाईमध्ये रस्त्याच्या बाजूलावाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्याअतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाईकरण्यात आली. मनपा उपायुक्त सुमंतमोरे यांच्या आदेशावरून अतिक्रमणविभाग प्रमुख नरेंद्र धनबहादुर, सहायकअतिक्रमण अधिकारी नरेश बोरकर,बडोणे, सैय्यद रफीक, विनोद वानखेडे,शैलेंद्र गोपणारायण आदींनी ही कारवाईकेली.
अधिक वाचा : शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ कार्यशाळेत रेशीम शेती व उदयोग विषयावर केले जाणार मार्गदर्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola